मुंबई येथील IIT चा विद्यार्थी साहील वाकोडे याच्या मृत्यूची SIT
मार्फत चौकशी व्हावी अशी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस ची मागणी
उल्हासनगर : IIT मुंबई येथील विद्यार्थी साहील वाकोडे यांच्या दुदैवी मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून त्याच्या कुटुंबीयांना न्याय देणे तसेच उच्च शिक्षण संस्था मध्ये जातीय भेदभावा विरोधात प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्या बाबत २८ सप्टेंबर २०२६ रोजी उल्हासनगरच्या तहसीलदार मॅडम यांना उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस( अनुसूचित जाती सेल ) चे अध्यक्ष राहूल प्रल्हाद कोजगे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी धडके, महादेव शेलार, ब्लॉक अध्यक्ष विशाल सोनवणे विकी आहुजा, अनिल यादव कुमार भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.