राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायत मधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर


महाराष्ट्रातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि  नगर पंचायतींसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

मुंबईत मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षते खाली ही सोडत निघाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत २४७  नगरपरिषद आणि १४७  नगर पंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असतील हे आज जाहीर झाले. 

२४७ नगरपरिषद मधील नगराध्यक्ष असे असतील  

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव – ३३ 

अनुसूचित जमाती  या प्रवर्गासाठी राखीव – ११ 

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव – ६७ 

खुला प्रवर्गासाठी राखीव – १३६ 

१४७ नगर पंचायतीं मधील नगराध्यक्ष असे असतील  

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव – १८  

अनुसूचित जमाती  या प्रवर्गासाठी राखीव – १३  

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव – ४०  

खुला प्रवर्गासाठी राखीव – ७६  

३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदेसाठी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय.

६७ नगरपरिषदपैकी ३४ नगरपरिषद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेत.

तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी १७ नगरपरिषदा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!