ऊल्हासनगरात शिवजयंती
ऊल्हासनगरात शिवजयंती मो ठ्याउत्साहात साजरी करण्यात आली . संविधाव बहुऊद्देशिय संस्था ने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या ऊस्ताहात साजरी केली. संस्थेचे सचिव निलेश भगत यांनी महाराजांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात केली. प्रेम ढेरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिध्दार्थ बागडे यांनी केले. तर संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी संजय वाघमारे, रोशन गवई, विजय पवार, जेष्ठ नेते माजी नगरसेवक प्रमोद टाले, प्रशांत धांडे, संदिप डोंगरे, सचिन काकडे, महेंद्र धांडे, योगेश वाघमारे, राजू सुर्यवंशी, नितीन काकडे तसेच इतर मान्यवर ऊपस्थित होते. शेवटी आयु. रोशन गवई साहेब यांनी उपस्थितांना लाडू वाटप केले.