उल्हासनगरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा


उल्हासनगरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा केला 

उल्हासनगर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून परमपूज्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बुधवार दि. १४ ॲाक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या प्रसंगी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुभाष टेकडी, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक  परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी ठीक ७ वाजता कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झाली. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्या समोर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती चे तसेच संविधान बहूद्देशीय संस्था चे भाई रोकडे यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली. त्याच बरोबर आर पी आय चे जेष्ठ नेते सुरेश सावंत, वंचित चे प्रा. सुरेश सोनवणे, विद्यमान नगरसेवक विकास खरात, नगरसेवक प्रदीप गोडसे, नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनीही मेणबत्ती प्रज्वलित करून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  केले. आणि सामूहिक बुद्धवंदना आणि त्रिसरण-पंचशील घेण्यात आले.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात जी क्रांती घडवून आणली, त्या स्मृतींना आज उजाळा देण्यात आला. बाबासाहेबांचे समता, बंधुता आणि न्यायाचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण कटिबद्ध रहाण्याचा  तसेच बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

यावेळी कार्यक्रमाला समाजसेवक संजय वाघमारे, विजय पवार, महेंद्र धांडे, गंगाधर मोहड, सुनिल इंगळे, सिध्दार्थ बागडे, विकास जाधव, निवेदिता जाधव, कैलास टपाल, राजू सुर्यवंशी, ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!