वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
संविधान बहुउद्देशिय संस्थेचा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनी
विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उल्हासनगर : १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन आणि संविधान बहुउद्देशिय संस्थेचा वर्धापन दिन सुभाष टेकडी, उल्हासनगर येथे संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम कार्यालयात डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार फुले वाहून आणि त्रीशरण पंचशील घेवून कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली.

यावेळी शिवसेना उ.बा.ठा चे शहर अध्यक्ष प्रशांत धांडे, कॅंग्रेस चे राहुल कोजगे, समाजसेवक सुरेश देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपस्थितांना वर्धापन दिनानिमित्त लाडू वाटप करण्यात आले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावर्षी संस्थेतर्फे डिजिटल एज्युकेशन स्कुल, विटभट्टी पालेगाव आणि जिजामाता मराठी प्राथमिक शाळा या उल्हासनगर / अंबरनाथ परिसरातील वीट भट्टी कामगारांच्या मुला / मुलींना ( विद्यार्थ्यांना ) राम मंदिर, वसार गाव येथे वह्या आणि पेन यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी तेथील सरपंच दिलीप फुलोरे, ज्ञानेश्वर फुलोरे… यांच्या उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.
संविधान बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी संस्थेबद्दल थोडक्यात प्रास्ताविक केले. संजय वाघमारे, निलेश भगत, विजय पवार, प्रशांत धांडे, राहुल कोजगे, सुरेश देशमुख, सुनिल मोहिते, महेंद्र धांडे, अतुल पारखंडे, राजू सुर्यवंशी, सिध्दार्थ बागडे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना लाडू वाटून स्वातंत्र्य दिन साजरा केला. शेवटी अरविंद तायडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

