उल्हासनगरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
वार्तांकन – सचिन काकडे, महेंद्र धांडे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्ष उल्हासात मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. उल्हासनगर येथे सुभाष टेकडी, आंबेडकर चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून व बुध्दवंदना घेऊन सायंकाळी मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. यावेळी पुतळा स्मारक समिती चे अधक्ष अरुण कांबळे सहीत समितीचे सर्व पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूकीत विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते तसेच भिमसैनिक सहभागी झाले होते.
कॅांग्रेस नेते रोहीत साळवे यांनी उभारलेला देखावा.
मनसे नेते प्रदिप कारभारी गोडसे यांनी उभारलेला देखावा.
शिवसेना नेते राजेश वानखेडे यांनी उभारलेला देखावा
DJ च्या तालावर अबालवृध्द महीला मोठ्या प्रमाणात नाचताना दिसत होत्या.
मिरवणूकीच्या मार्गात प्रत्येक ठीकाणच्या मंडळांनी मिरवणूकीत सहभागी झालेल्यांसाठी पाणी, थंडपेय इ. व्यवस्था केली होती. ज्या विभागातून मिरवणूक जात होती त्या विभागातील लोकं मिरवणूकीत सामिल होत होती.
डॅा. आंबेडकर चौक येथून मिरवणूक निघाली आणि शेजारीच रिक्षा युनियनच्या वतीने सरबत,आणि जेवण भिमअनुयायांसाठी ठेवले होते. सिध्दार्थ स्नेह मंडळ च्या मैदानात भव्यदिव्य असा DJ चा सेट उभारला होता. तरूण तरूणी तेथे थिरकत होत्या. पूढे भरतनगर च्या रस्त्यावर, नागसेन नगर, संविधान चौक, माता रमाई चौक अश्या बऱ्याच ठीकाणी मिरवणूकीचं स्वागत केलं. पूढे लालचक्की मांर्गे पुन्हा आंबेडकर चौक येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.
माजी नगरसेवक प्रमोद टाले यांचे चिरंजीव आयु. अभिषेक टाले ( प्रथमवर्ग अधिकारी ) जयंती निमित्त लुधियाना, पंजाब येथे भाषण करताना