NEET पेपर फुटी प्रकरणी आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) चे लाक्षणिक धरणे आंदोलन


ऊल्हासनगर : सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) आणि डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत जंतर मंतर येथे सूरू असलेले (NEET) परीक्षा विरोधातील अंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन आझाद समाज पार्टी, भीम आर्मी व डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्स यांच्या वतीने, ऍडव्होकेट भाई चंद्रशेखर आजाद (मा. खासदार, नगीना लोकसभा मतदारसंघ) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. संदेश सकपाळ (महाराष्ट्र सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी) आणि त्यांचे सहकारी यांनी एक दिवसीय  लाक्षणिक धरणे आंदोलन करीत असताना या कार्यक्रमात विविध पक्ष / सामाजिक संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या धरणे आंदोलन वेळी स्वाक्षरी मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संखेने या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्यांद्वारे आपला निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

धरणे आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. आणि याठिकाणी एकच जल्लोष करण्यात आला. व थोड्याच वेळात..  हे धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले.

संदेश सकपाळ, आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) चे महाराष्ट्र सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी, तसेच  डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्सचे उल्हासनगर शहराध्यक्ष हनुमान कांबळे, सुरेन्द्र गायकवाड, मच्छिंद्र मोरे, विजय बोराडे, शितल सपकाळ,  शांताराम निकम, संजय वाघमारे, डॉ. रजनीकांत गायकवाड,  बाळू पगारे,  शिल्पा बोराडे, महेंद्र अहिरे, सुधीर बागुल यांच्यासह अनेक पक्षांचे, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!