विद्यार्थ्यांचा उल्हासनगर महापालीकेच्या वतीने गुण गौरव
उल्हासनगर : ०१. जून. २०२४
उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अजिज शेख यांनी चला वळू या ध्येयाकडे या संकल्पनेतून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत चांगले गुण प्राप्त केलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मुला-मुलींचा गौरव केला.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, ललीत खोब्रागडे, किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, मनिष हिवरे, प्राजक्ता कुलकर्णी, निलम कदम, विनोद केणे, बाळू नेटके, राजा बुलानी, शांताराम चौधरी, दिप्ती पवार, विशाखा सावंत, सहायक आयुक्त, गणेश शिंपी, राजेश घनघाव इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. अजीज शेख यांचे हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपजिल्हाधिकारी सागर धनाजी मुळीक, व दीक्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची मुलगी अरिबा जमीर लेंगरेकर ही १० वी मध्ये ९०% आणि सहा. संचालक नगर रचना या विभागाचे ललीत खोब्रागडे यांचा मुलगा मध्यांश ललीत खोब्रागडे हा १० वी मध्ये ९७% गुणांनी तसेच सहा. सांर्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिंवरे यांची मुलगी सौम्या मनिष हिवरे ही १२ वी मध्ये ९५% गुणांनी उतिर्ण झाल्याबद्दल या सर्वाचे व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचेही महापालिका आयुक्त डॉ. अजीज शेख यांनी मनापासून कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी केले.