स्वांतत्र्य दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला
महेंद्र धांडे : प्रतिनिधि उगवता सूर्य
उल्हासनगर : उल्हासनगर महानगर पालिके तर्फे स्वांतत्र्य दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वांतत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ध्वजारोहणचा कार्यक्रम उल्हासनगर महापालिकेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.
उल्हासनगर महानगर पालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त तथा प्रशासक मनिषा आव्हाळे मॅम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उल्हासनगर शहराचे आमदार कुमार आयलानी, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष आणि भाजपा चे माजी नगरसेवक महेश सुखरामानी, आरपीआय जिल्हा अध्यक्ष नाना बागुल, माजी उपमहापौर भगवान भालेराव, तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, गणेश शिंपी, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, पालिकेचे सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, विनोद केणे, चारही प्रभागाचे सहाय्यक आयुक्त, तसेच इतर अधिकारी कर्मचारी आणि कामगार युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालिकेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना आणि सलामी देण्यात आली. उल्हासनगर महानगर पालिकेच्या इमारतीला अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली.