धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी दीक्षाभूमीवरील समस्या सोडवा
धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी दीक्षाभूमीवरील समस्या सोडवा
बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र





धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दीक्षाभूमीवर दरवर्षी दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दीक्षाभूमीवरील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांची गर्दी येथे होत असते. प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत असतात.
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दीक्षाभूमी संकुलातील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दीक्षा भूमी परिसरात पाणी साचणे, रस्त्यांची वाईट अवस्था, स्वच्छतेचा अभाव तसेच तात्पुरत्या निवास-व्यवस्थेतील कमतरता यामुळे भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.
प्रशासनाने लवकरात लवकर यावर विचार करावा आणि भाविकांना याचा त्रास होणार नाही याची दाखल घ्यावी.


