१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि संविधान बहुउद्देशिय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
महेंद्र धांडे : प्रतिनिधि उगवता सूर्य
उल्हासनगर : आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन आणि संविधान बहुउद्देशिय संस्थेचा वर्धापन दिन सुभाष टेकडी, उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यालयात डॉ. बाबासाहेब आबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमांना हार फुले वाहून कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली.
यावेळी सुभाष टेकडी परिसरातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आले. त्या अगोदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध पक्षाचे नेते आणि मान्यवर यांचा शाल देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पी आर पी चे नेते आणि माजी नगरसेवक प्रमोद टाले, आर पी आय चे प्रशांत धांडे, कमलाकर सूर्यवंशी, मनसे चे प्रदीप गोडसे, शिवसेनेच्या नगरसेविका मंदाताई सोनकांबळे, सुरेश देशमुख, राहुल कोजगे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष बौध्दाचार्य रोशन पगारे, बी एस पी चे निवेदिता जाधव आणि विकास जाधव, आनंद सोनताटे वंचित चे दिवाकर खळे, युवराज भगत, तसेच प्रदीप कुमार, प्रकाश वानखेडे, गंगाधर मोहोड आणि दैनिक सम्राट चे उपसंपादक रवींद्र धांडे हे उपस्थित होते. त्यानंतर सर्व उपस्थितांना आणि विद्यार्थ्याना समोसा आणि जीलेबी वाटण्यात आली. आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष भाई रोकडे यांनी केले. यावेळी सचिव निलेश भगत उपाध्यक्ष संजय वाघमारे खजिनदार विजय पवार याबरोबर प्रेम ढेरे, प्रकाश इंगळे, सचिन काकडे, रोशन गवई, सुनिल मोहिते आणि सिद्धार्थ बागडे, अतुल पारखंडे उपस्थित होते.