डंम्पिंग ग्राउंड च्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन


उल्हासनगर : १०.०७.२०२४   

 वृत्त संकलन : महेंद्र धांडे

डंम्पिंग ग्राउंड च्या विरोधात काँग्रेस पक्षाचे  उपोषण

उल्हासनगर –  उल्हासनगर शहरातील  कॅम्प नंबर पाच येथे असलेले डम्पिंग ग्राऊंड हटवण्याच्या मागणीसाठी उल्हासनगर काँग्रेस च्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येत आहे. शहरातील जनतेचे आरोग्य डंम्पिंगच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. म्हणून  सदरचे डंम्पिंग शहरातुन त्वरित हटविण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उल्हासनगर नंबर पाच नेताजी चौकात उपोषणाला सुरुवात करण्यात आली. शहर विकास मंचाचे शहर प्रमुख राजेश फक्के यांनी उपोषणाला जाहीर पांठीबा दिला. उल्हासनगर नंबर ५ येथील डंम्पिंग ग्राऊंड कचरा टाकून मोठा ढिगारा झाल्याने परीसरात व आजुबाजुच्या विभागात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात शांती प्रकाश विद्यालय ही शाळा असुन शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नागरिक जीवमुठीत घेऊन जीवन जगत आहेत. आसपासचे शेकडो नागरी अस्थमा, टी.बी. त्वचारोग आदी जीवघेण्या गंभीर आजाराचे बळी ठरत आहेत. सदरची बाब नागरिकावर अन्याय करणारी आहे. महानगर पालिका प्रशासन नागरीकांच्या जिवाशी खेळत आहे. यासंर्दभात काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत.  तरीसुद्धा  राज्य सरकार, व मनपा प्रशासन याविषयावर तोडगा काढण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नाही. महानगर पालिका प्रशासनाने  सदरचे डंम्पिग ग्राऊंड त्वरित त्या जागेवरून हटवुन नागरिकांना न्याय दयावा. अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी उपोषण करते वेळी पत्रकारांशी बोलताना केली. उपोषणात रोहित साळवे, किशोर धडके, कुलदिप एलसिंगाने, मनिष ठाकुर, अंजली साळवे, आशाराम टाक, श्याम मढवी, विशाल सोनवणे, वामदेव भोईर, शैलेश रुपेकर, निलेश जाधव, दिपक सोनोने, सिंधुताई रामटेके, शंकर आहुजा, आदि कार्यकर्ते व महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. शहरातील विविध पक्ष-संघटना, उपोषणस्थळी येऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत.  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!