उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने वृक्षारोपण


उल्हासनगर : प्रकाश इंगळे यांजकडून…. 

रविवारी १३ जुलै २०२५  रोजी उल्हासनगर ( पूर्व ) वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  प्रभाग क्रमांक १३, १८ आणि १९ या विभागातील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम  करण्यात आला. महाराणा प्रताप चौक येथून सुरुवात करून राजपुत गल्ली, डिफेन्स कॉलनी, समता नगर तसेच तानाजी नगर या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी स्थानिकांनी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक विभागातील स्थानिकांनी वृक्षारोपणातील झाडाचे पालकत्व स्विकारले. वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, शहर संघटक देवानंद शिरसाट, जेष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे, वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड, वॉर्ड अध्यक्ष युवराज भगत, वॉर्ड अध्यक्ष भारत थोरात, वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव आदी मान्यवर तसेच पत्रकार आबासाहेब वाघमारे, आबा साठे आणि मच्छिंद्र मोरे उपस्थित होते.

सदर उपक्रमात समाजसेवक सेवाधारी हिरा यांनी अतिशय मोलाची मदत केली. वृक्षमित्र बी. आर. पाटील तसेच पी. के. कांबळे यांनी या वृक्षारोपणासाठी  झाडे उपलब्ध करून दिली. वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे (माही) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!