उल्हासनगर येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी
उल्हासनगर – २३ मे २०२४
जगाला शांततेचा संदेश देणारे आणि जगाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
उल्हासनगर येथे धम्म पहाट समिति, यांचे वतीने सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी धम्म पहाट समितिने अतिशय भव्य असा देखावा (Decoration) उभारला होता. संपूर्ण उल्हासनगर मधील बौद्ध अनुयायी देखावा बघण्यासाठी येत आहेत.
सकाळी ७ वाजता विभागातील भीम अनुयायी चौकात जमून भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन करून व बुध्दवंदना घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रवीण भगत याच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व उपासक उपसीका यांना खीर दान करण्यात आले.
बुद्ध जयंतीला याप्रकरचा देखावा (Decoration) प्रथमच करण्यात आला. त्यामुळे येथील भीम अनुयायी धम्म पहाट समितीला धन्यवाद देत आहेत. यापुढेही अश्याच प्रकारचे भव्य देखावे उभे करावेत अशी चर्चा होत आहे.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती चे अधक्ष अरुण कांबळे, माजी नगरसेवक प्रमोद टाले, प्रशांत धांडे, वंचित नेते सारंग थोरात, संविधान बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष भाई रोकडे, प्रा. सुरेश सोनवणे, रोशन गवई, प्रकाश इंगळे, दिवाकर खळे, प्रदीप कुमार, प्रदीप कपूर, सुरेश देशमुख, विजय थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.
बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी धम्म पहाट समितीचे संजय वाघमारे, निलेश भगत, विजय पवार, प्रेम ढेरे, आनंद सोनताटे, राहुल कोजगे, जितेंद्र दोंदे, नितीन काकडे, सिद्धार्थ बागडे, सचिन काकडे, इतर मान्यवरांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.