सोसाट्याचा वारा आणि पावसामूळे झाड आणि धर्मवीर संभाजी राजे प्रवेशद्वार कोसळले.


लालचक्की चौकात सोसाट्याचा वारा आणि  मुसळधार पावसामूळे

गुलमोहरचे झाड आणि धर्मवीर संभाजी राजे प्रवेशद्वार कोसळले.

लालचक्की चौक, उल्हासनगर ४,  अचानक आलेल्या मुसळधार पावसामूळे येथील  गुलमोहरा चे झाड विद्युत पोलवर पडून तेथे असलेले धर्मवीर संभाजी राजे प्रवेशद्वार  देखील कोसळले. संपूर्ण रस्त्यावर झाड आणि प्रवेशद्वार पडल्यामुळे रस्ताच राहदरीसाठी बंद झाला. यावेळी तेथून जाणारी एक रिक्षा झाडाखाली आल्यामुळे त्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासाह मुसळधार पाऊस पडत असताना येथील लालचक्की चौकातील भलेमोठे गुलमोहराचे झाड  अचानक कोसळले.त्यावेळी  एक रिक्षा पॅसेंजरला घेऊन स्टेशन कडे जात असताना चालकाने अत्यंत हुषारीने रिक्षा जागीच थांबवली आणि त्यामुळे रिक्षातील प्रवासी रिक्षातून उतरून बाहेर पळाले त्यामुळे ते थोडक्यात वाचले. पण रिक्षाचे खूप नुकसान  झाले.

ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण विभागात पसरली व एकच घबराट झाली. याबद्दलची माहिती अग्निशमन दलाला तसेच पालिकेच्या आपत्कालीन विभागाला मिळताच ते याठिकाणी तत्काळ आले. व रस्त्यावर आडवे पडलेले झाड काढण्याच्या कामाला सुरुवात केली.  या घटनेमुळे विद्युत पोल आणि तारा यांचेही नुकसान झाले. धर्मवीर संभाजी राजे प्रवेशद्वाराचे देखील कोसळल्यामुळे मोठेच नुकसान झाले आहे.

पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. घटनास्थळी मनसेचे प्रदीप गोडसे, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप डोंगरे, संभाजी चौक शिवसेना शाखाप्रमुख राजू पाटील आणि आणि सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे, सुरेश देशमुख हेही  या आपत्कालीन परिस्थितीत मदत करत होते.    

मनसेचे प्रदीप गोडसे यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत सांगितले की आम्ही वारंवार महापालिकेला निवेदनाद्वारे मागणी केली होती की धोकादायक झाडांची महापालिकेने पाहणी करून ती तोडावी पण पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. तसेच माहपालिकेने शहरातील प्रवेशद्वारांची देखील पाहणी करावी व ती दुरुस्तही करावीत जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाही असेही  प्रदीप गोडसे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!