डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उल्हासनगरात भव्य बाईक रॅली
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर कॅम्प नंबर १ ते ५ या संपूर्ण शहरभरातून आंबेडकरी अनुयायांनी जयंती उत्सव समिती स्थापन करून बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या संदर्भात तयारी कुठपर्यंत आली याची आढावा बैठक उल्हासनगर ४ येथील शांतीसागर हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बाईक रॅलीचे नियोजन, मार्ग व खर्च याची चर्चा करण्यात आली.
राजू सोनवणे यांनी काय तयारी झाली याची माहिती दिली. रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी होतील यासाठी मोहल्ला बैठका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याबाबत सांगण्यात आले.या रॅलीमध्ये महिलासुद्धा भाग घेतील असे नाना बागुल यांनी सांगितले.
रॅली भव्य होणार याबाबत सर्वच उपस्थितांनी ग्वाही दिली.
संपूर्ण शहरभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लागणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
या बैठकीत नाना बागुल, सारंग थोरात, अरुण कांबळे, राजू सोनवणे, किरण सोनवणे, शांताराम निकम, बाळाराम जाधव, प्रमोद टाले, प्रशांत धांडे, गंगाधर मोहोड, अंबादास गायकवाड, विश्वनाथ जाधव, तुकाराम सोनवणे, प्रकाश राव, तांबे, डॉ.मोहोड, आर एस गवई, प्रदीप डोखे, दिवाकर खळे, प्रशांत सोनवणे, प्रकाश रातांबे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
भव्य बाईक रॅलीमधे प्रत्येकाने आपल्या विभागातून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले. १००० बाईक, ५०० रिक्षा रॅलीत सहभागी होतील असे नाना बागुल व राजू सोनवणे यांनी सांगितले.