माजी मंत्री, पॅंथर नेते गंगाधर गाडे यांचे दु:खद निधन
रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाचे माजी नेते आणि पॅंथर रिपब्लिक पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे निधन
आंबेडकर चळवळीतील एक आघाडीचे नाव, नामांतर आंदोलनाचे एक प्रमुख नेते, भीम योद्धा माजी मंत्री गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकर चळवळीतील आग्रगण्य नाव माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे यांचे शनिवार दिनांक ०४. मे. २०२४ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू होते, परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत पहाटे मावळली.
गंगाधर गाडे यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे. असा पॅंथर, लोकनेता पुन्हा होणे नाही. अश्या प्रकारचे मेसेज सोशल मिडियावर फीरत आहेत. अशा या नेत्यास अखेरचा निळा सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली.
दिवंगत पॅंथर गंगाधर गाडे यांना उगवता सूर्य परिवारा कडून भावपूर्ण आदरांजली.