माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं.  श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळताच काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या. त्या नंतर मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली. 

मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

१९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण- उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.

सन २००४ साली ज्यावेळी कॉँग्रेस प्रणीत यूपीए सरकारच्या वतीने डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली होती  पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही.  त्यानंतर २००९ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.

राजकारणात फार कमी लोकांना  सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!