कु. प्रियांका सुरेश मोहिते ची UPSC 2024 परीक्षा उत्तीर्ण, स्वराज्य संघटने ने केला सत्कार


कु. प्रियांका सुरेश मोहिते ची UPSC 2024 परीक्षा उत्तीर्ण,

महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS पदावर नियुक्ती

उल्हासनगर सुभाष टेकडी या आपल्या विभागातील आंबेडकरी विचारसरणीच्या कु. प्रियांका सुरेश मोहिते यांनी UPSC 2024 परीक्षा उत्तीर्ण करत महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS पदावर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल स्वराज्य संघटनेच्यावतीने २ जून २०२५ रोजी त्यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमावेळी IPS प्रियांका मोहिते यांना गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” हे पुस्तक, शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना IPS प्रियांका मोहिते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून प्रियांका मोहिते यांचे कौतुक करत सांगितले की, “IPS प्रियांका मोहिते या बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या खऱ्या अनुयायीं असून, समाजातील इतर तरुणांनी त्यांच्यासारखा आदर्श घेऊन शासनकर्ती जमात होण्यासाठी पुढे यावे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!