उल्हासनगरची लेक प्रियंका सुरेश मोहिते ने केली UPSC २०२४ परीक्षा उत्तीर्ण
UPSC 2024 परीक्षेत उल्हासनगरची लेक
प्रियंका सुरेश मोहिते ची IPS पदी निवड
नागसेन नगर, सुभाष टेकडी, उल्हासनगर-४ येथे राहणारी उल्हासनगरची लेक, सामाजिक भान असलेली प्रियंका सुरेश मोहिते या तरुणीने UPSC 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची निवड महाराष्ट्र कॅडर IPS पदी झाली.
आपल्या शहरातील, विभागात रहाणारी आपली लेक IPS अधिकारी आहे म्हणून प्रियंका चा कौतुक सोहळा सोमवार दिनांक ०२ जून २०२५ रोजी संविधान बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक शांताराम निकम, शिवसेनेचे संदीप डोंगरे, मनसेचे प्रदीप गोडसे सामाजिक कार्यकर्ते सुरेश देशमुख तसेच दैनिक सम्राट चे उपसंपादक रविंद्र धांडे हे देखील या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते. शुभेच्छा देताना शांताराम निकम यांनी प्रियंका मोहिते ला सामाजिक बंधीलकीचे भान ठेवून कर्तव्यपार पाडावे हा वडीलकीचा सल्ला दिला. यावेळी प्रियंका ने डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे प्रेरीत होउन मी हा पल्ला गाठला असे सांगितले.
कौतुक सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी केले. तसेच संस्थेचे मान्यवर संजय वाघमारे, निलेश भगत, विजय पवार, महेंद्र धांडे, राजू सुर्यवंशी, धम्मसेवक सिध्दार्थ बागडे, सुनिल मोहिते आणि रोशन गवई उपस्थित होते.