प्रजासत्ताक दिनाच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने उल्हासनगरात ” संविधान जागर सप्ताह “
संविधान जागर सप्ताहाला सुरुवात
सचिन काकडे – प्रतिनिधि : उगवता सूर्य
उल्हासनगर –: उल्हासनगर-४, परिसरातील विविध समविचारी सामाजिक संस्था यांच्या मार्फत संविधान जागर सप्ताहाचे नियोजन, प्रजासत्ताक दिनाच्या अमृत मोहोत्सवाच्या निमित्ताने, १९ ते २६ जानेवारी, २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. या आयोजना नुसार, सामाजिक संस्थाचे कार्यालय तथा वस्ती पातळीवर, विभागवार संविधान जनजागृती, संविधानाची महती व माहिती प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचली पाहिजे हा उद्देश असून २६ जानेवारी रोजी समारोप करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक १९ जानेवारी, २०२५ “संविधान बहुउद्देशीय संस्था” डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, येथे या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व संविधान प्रेमी व संविधान समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व प्रस्तावना मांडली या वेळी “संविधान सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी प्रा. विकास जाधव यांनी आपले विचार मांडले तसेच राहुल ससाणे, किरण सोनवणे यांनी देखील, भारतीय संविधान या विषयाच्या अनुषंगाने आव्हाने व सद्यपरिस्थिती यावर चर्चा केली. यावेळी आयोजक संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे व संस्थेचे उपाध्यक्ष संजय वाघमारे यांनी प्रस्ताविक केले. मानवता अभियान संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता जाधव यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले. हा संविधान जागर सप्ताहाचा पाहिलाच जागर यशस्वी रित्या संपन्न झाला.
या पुढेही सलग सहा दिवस हा संविधान जागर सप्ताह सुरु असणार आहे. आजच्या दिवशी सर्व संविधान प्रेमी ची उपस्थिती होती. विकास खरात, राजेश वानखेडे, प्रशांत धांडे, प्रा सुरेश सोनवणे, नीलेश भगत, रोशन गवई, विजय पवार, राजू सूर्यवंशी, महेंद्र धांडे, अमर मोरे, सुनील मोहिते, ॲड. मनिषा झेंडे, राहुल कोंजगे, रवी नागदिवे आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार कैलास साबळे, रवींद्र धांडे, रामेश्वर गवई इतर मान्यवर उपास्थित होते.