संविधान दिन / प्रजासत्ताक दिनी अनुभूती चा “आम्ही संविधानवादी अभियान” पथनाट्याचा कार्यक्रम
२६ जानेवारी २०२५ रोजी, संविधान दिन / प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पथनाट्याचा कार्यक्रम
आज २६ जानेवारी २०२५ रोजी, संविधान दिन / प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनुभूती सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने “आम्ही संविधानवादी अभियान” च्या अंतर्गत उलहासनागर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी या ठिकाणी पथ नाट्य च्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका वाचन, आणि सार्वजनिक संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अनुभूती सामाजिक संस्थेच्या प्रमुख आयु दीपा पवार यांच्या अनुभूति संचालित सांस्कृतिक गट बदलाचे पर्व कला मंच यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये ५० हून अधिक युवक / युवतींनी सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ येथे या तरूणांनी संविधान, थोर राष्ट्रीय महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या गौरवपर गीतांवर ठेका धरत जनजागृती केली.
सांस्कृतिक गट बदलाचे पर्व कला मंच.. न्याय, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा हमी देणाऱ्या संविधानिक मूल्यांवर आधारित विविध सामाजिक वर्गांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा / पथनाट्याचा वापर करून मनोरंजनातून जनजागृती असा वसा घेत आयु. दीपा पवार आणि त्यांचा संच कार्यक्रम करीत असतात.
आज या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समितीच्या आयु. राणी बैसाणे मॅम, ॲड. मनिषा झेंडे मॅम तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे, नीलेश भगत, विजय पवार, रोशन गवई, सचिन काकडे, राजू सूर्यवंशी, योगेश (रिंकू) वाघमारे, धम्मसेवक सिध्दार्थ बागडे आणि सुभाष टेकडी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.