संविधान दिना निमित्त संविधान सन्मान बाईक रॅली चे आयोजन


आज संविधान दिना निमित्त ऊल्हासनगर येथे

संविधान सन्मान बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले.

उल्हासनगर – मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षीही संविधान दिना निमित्त संविधान बहुऊद्देशिय संस्था, संविधान परिवार उल्हासनगर यांच्या वतीने संविधान सन्मान बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले.

यावेळी सुभाष टेकडी, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जेष्ठ सामाजिक नेते आयु सारंग थोरात साहेब यांनी पुष्पमाला अर्पण केली. तसेच माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी दिप प्रज्वलन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे, पुतळा स्मारक समिती चे अध्यक्ष अरूण कांबळे, मनसे चे प्रदिप गोडसे, संजय वाघमारे, दिवाकर खळे, आनंद सोनताटे, सुनिल मोहीते, राजकुमार कांबळे सर, सुरेश देशमुख, कमलाकर सुर्यवंशी, वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे आदींनी पुष्प अर्पण केले. पुज्य भंते गण यांचे वतिने बुध्दवंदना, त्रिशरण पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी भारतीय संविधानाचे उद्देशिकाचे वाचन केले. व संविधान रॅली ला सुरवात झाली. रॅलीत मान्यवरांनी ऊपस्थित राहून सहभाग घेतला. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच इतर संघटना आणि भिमसैनिक या रॅलीत सहभागी झाले.

संविधान रॅली डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सूरू होऊन लालचक्की – व्हीनस- नेताजी – कुर्ला कॅम्प – नागसेन नगर यामार्गे नंतर शेवट पून्हा डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीतील सहभागी मान्यवरांना अल्पोपहार म्हणून वडापाव आणि पाणी चे वाटप करण्यात आले.

समारोप करताना भाई रोकडे आणि प्रकाश इंगळे यांनी सहभाग घेतलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच पोलीसांप्रती आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव निलेश भगत, प्रकाश इंगळे, विजय पवार, रोशन गवई, प्रेम ढेरे, सचिन काकडे , राजू सूर्यवंशी , कैलास टपाल, महेंद्र धांडे, नितिन काकडे आदींनी मोलाचे सहकार्य केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
01:57