विधानसभा निवडणुकीत महायुतीची त्सुनामी, महाविकास आघाडी उध्वस्त
उद्या वानखेडे स्टेडियम वर शपथविधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय नोंदवत बहुमताने महाराष्ट्रावर एकहाती सत्ता काबिज केली. महायुतीच्या या विजयाने महाविकास आघाडीची अक्षरशः धूळदाण उडाली.
लाडकी बहीण, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाराष्ट्राच्या मतदारांवर राज्यभर मोठा परिणाम झालेला दिसतो.
पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडली होती. त्याचाच वचपा महायुतीने काढल्याचे बोलले जाते. उद्या सोमवारी वानखेडे स्टेडियम वर नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे.
नवीन विधानसभेत संख्याबळा अभावी विरोधी पक्षनेता असणार नाही.
विधानसभेतील पक्षीय बलाबल या प्रमाणे
महायुती | महाविकास आघाडी | ||
भाजपा | १३२ | शिवसेना (उबाठा) | २० |
शिवसेना (शिंदे) | ५७ | कॉँग्रेस | १६ |
राष्ट्रवादी कॉँग्रेस (अ प ) | ४१ | राष्ट्रवादी कॉँग्रेस (SP) | १० |
इतर | १२ |
जिंकलेले दिग्गज नेते | पराभव झालेले दिग्गज नेते |
देवेंद्र फडणवीस | पृथ्वीराज चव्हाण |
एकनाथ शिंदे | बाळासाहेब थोरात |
अजित पवार | अमित ठाकरे |
धनंजय मुंडे | बाळा नांदगांवकर |
नाना पटोले | हितेंद्र ठाकूर |
राधाकृष्ण विखे-पाटील | क्षितीज ठाकूर |
छगन भुजबळ | नवाब मलिक |
रोहित पवार | हर्षवर्धन पाटील |
आदित्य ठाकरे | रवींद्र धंगेकर |
जयंत पाटील | वैभव नाईक |
रोहिणी खडसे | |
राजेश टोपे | |
धीरज देशमुख |