सागरालाही लाजवेल असा अथांग भीमसागर चैत्यभूमीवर लोटला
महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन
सूर्य मावळला पण लाखों..
घरांना पिढ्यान पिढ्या पुरेल..
एव्हढा प्रकाश देवून गेला.
प्रतिनिधि : प्रकाश इंगळे, महेंद्र धांडे, सचिन काकडे
आधुनिक भारताचे निर्माते , महानायक , हजारो वर्षापासून दलित, उपेक्षित वंचितांचा आवाज / वेदना मांडणारा, बहिष्कृत भारताचा मुकनायक आणी वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांचा बोलका स्वर, शतकानुशतके अज्ञान, दारिद्र , गुलामी, आणी शोषितांच्या चक्रव्यूहात पुरते अडकलेल्या माणसांचा मुक्तीदाता, आधुनिक विज्ञानेश्वर ,पं,पु, डाॅ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना साठी मुंबईत आलेला आंबेडकरी भीम सागर चैत्यभुमीवर उसळत आहे. १-२ तारखेपासूनच हजारो भीम अनुयायी मुंबईत दाखल होत असतात. देशातील विविध राज्यातून लोकं त्यांच्या मुक्तीदात्याला, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले असतात. यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव नसतो.
वर्षानुवर्षे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. एव्हढया मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर असूनही मुंबईमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडताना दिसत नाही. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत आपल्या बापाला अभिवादन करायला ही जनता आलेली असते.
अश्या आमच्या मुक्तीदात्याला
उगवता सूर्य परिवरा कडून
भावपूर्ण आदरांजली व
विनम्र अभिवादन.