वैचारिक आंबेडकरी कवि संमेलन संपन्न


आसनगांवात वैचारिक आंबेडकरी कवि संमेलन संपन्न

आसनगांव : स्नेहा रोकडे मेमोरियल फौंडेशन, ठाणे  व जागर मानवतेचा ग्रुप यांच्या संयुक्त आयोजनाने वैचारिक आंबेडकरी कवि संमेलन रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी,  आंबेडकरी कवितांची मेजवानी हा कार्यक्रम आसनगांव येथे नुकताच पार पडला.  या  कार्यक्रमाचे उद्घाटन थोरसमाज सेविका सौ. लताताई भरित यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर रोकडे आणि  प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेश निकम ( संघकारा) हे उपस्थित होते. 

या कवि संमेलनाच्या  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रकाश वानखेडे यांनी केले तर बुध्दीराज गवळी, प्रतिक कांबळे,  संजय रोकडे, राजेंद्र बनसोडे, विकास भंडारे, वसंत हिरे, प्रतिक नाईक, वसंत वाघमारे इत्यादी अनेक कविंनी सहभाग दर्शविला. 

महेश  सावंत, संतोष नरावडे, आनंद वाघचौरे, आनंद भंडागे, मगन गवळे, सुरेश पंडित, अमोल बोढारे, नम्रता शेलवले, मिलिंद आहेर, प्रदिप भडांगे, गणेश आहिरे, मुकेश मूण, आदी कविंनी संमेलनात सहभाग घेतला. 

कार्यक्रम यशस्वी करण्या करिता श्री. शेखर भरित याचे मोलाचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!