केंद्रात ४०० पार दूरच.. राज्यात महाविकास आघाडीच भारी
देशातील लोकशाहीचा मोठा उस्तव नुकताच पार पडला. काल चार तारखेला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मागील दहा वर्षे केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. या वेळेस भाजपला स्पष्ट बहुमत न मिळता दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत.
पुन्हा एकदा देशात आघाडी सरकार येणार आहे. यावेळी सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मागील वेळेस म्हणजे २०१९ ला जिकलेल्या ३०३ जागांपैकी तब्बल ६३ जागांवर त्यांचा पराभव झाला. अब की बार ४०० पार ची घोषणा हवेतच विरली. स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी लागणारे २७२ खासदारही भाजपला यावेळी निवडून आणता आले नाही. त्या साठी भाजपला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यावेळी चांगली कामगिरी करत आहे. त्यांना सत्तास्थापने साठी ३७ खासदारांची आवश्यकता आहे.
एकूणच सत्तेत असताना ज्या पद्धतीने सर्व शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांना वेठीस धरण्याचे काम केले त्याचाच परिणाम आज बहुतेक सर्व विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडी च्या रूपात एक मजबूत पर्याय म्हणून उभे आहेत.
महाराष्ट्रातही भाजपला (महायुतीला) पर्याय म्हणून महाविकास आघाडी ने मोठी मुसंडी मारली आहे. महायुतीला चारीमुंड्या चित करत महाविकास आघाडी प्रथम क्रमांकावर आली आहे.
मोठे मातब्बर प्रस्थापित महायुतीच्या नेत्यांना महाविकास आघाडीने घरचा रस्ता दाखवला, पराभूत केले.
विजयी उमेदवारांची यादी | |||
१ | नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस | २५ | ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट |
२ | धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी) | २६ | उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप |
३ | जळगाव – स्मिता वाघ – भाजप | २७ | उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट |
४ | रावेर – रक्षा खडसे – भाजप | २८ | मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट |
५ | बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट | २९ | उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस |
६ | अकोला – अनुप धोत्रे – भाजप | ३० | दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट |
७ | अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस | ३१ | दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट |
८ | वर्धा – अमर काळे– शरद पवार गट | ३२ | रायगड – सुनील तटकरे– अजित पवार |
९ | रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस | ३३ | मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट |
१० | नागपूर – नितीन गडकरी – भाजप | ३४ | पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप |
११ | भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस | ३५ | बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट |
१२ | गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस | ३६ | शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट |
१३ | चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस | ३७ | अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट |
१४ | यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट | ३८ | शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट |
१५ | हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट | ३९ | बीड – बजरंग बाप्पा सोनावणे – शरद पवार गट |
१६ | नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस | ४० | धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे |
१७ | परभणी – संजय जाधव – ठाकरे | ४१ | लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस |
१८ | जालना – कल्याण काळे – काँग्रेस | ४२ | सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस |
१९ | औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट | ४३ | माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट |
२० | दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट | ४४ | सांगली – विशाल पाटील – अपक्ष |
२१ | नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट | ४५ | सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप |
२२ | पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप | ४६ | सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप |
२३ | भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट | ४७ | कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस |
२४ | कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट | ४८ | हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट |