वंचित बहुजन आघाडीचा सत्ता निर्धार मेळावा व पक्ष प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचा सत्ता निर्धार मेळावा व
संजय गुप्ता यांचा हजारों कार्यकर्त्यां सहीत पक्ष प्रवेश
उल्हासनगर :
वंचित बहुजन आघाडी, उल्हासनगर च्या वतीने सत्ता निर्धार मेळावा व संजय गुप्ता ( उत्तर भारतीय भा ज प नेते ) यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसहित पक्ष प्रवेश उल्हासनगर नंबर ३ येथील सिंधु भवन येथे मोठ्या जल्लोषात झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर उपस्थित होत्या. त्याबरोबर माजी ठाणे जिल्हाध्यक्षा मायाताई कांबळे, उल्हासनगर महिला अध्यक्षा रेखाताई उबाळे, उल्हासनगर ( पूर्व ) चे अध्यक्ष शेषराव वाघमारे, नेते सारंग थोरात इत्यादि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवा नेते सुजात आंबेडकर हे येणार होते पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत.
वंचित बहुजन आघाडी त प्रवेशा वेळी संजय गुप्ता यांनी आपल्या मनोगतात शहरातील भाजप आणि कलाणी परिवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांनी आज पर्यन्त सत्तेत असताना शहर विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे जर मला पक्षाने विधानसभेची निवडणुक लढवण्याची संधी दिल्यास त्या संधीचे सोने करू व शहर विकासाकडे लक्ष देऊ, तसेच पक्ष विस्ताराची विशेष काळजी घेऊ असे जाहीर केले.
संजय गुप्ता हे आपल्या हजारो कार्यकर्त्यां सहित मेळाव्याला उपस्थित होते. सिंधु भवन चा हॉल हा वंचित चे कार्यकर्ते तसेच उत्तर भारतीयांचा मोठा सहभाग होता. सत्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन उल्हासनगर ( पूर्व ) वंचित चे अध्यक्ष उज्ज्वल महाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.