ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभा अध्यक्षपदी तर राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड


२६ जून २०२४ 

१८ व्या लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला यांची निवड

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.

भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी ओम  बिर्ला यांना  त्यांच्या खुर्चीपर्यंत नेले आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खूर्ची स्वीकारली. ओम बिर्ला यांचा गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. तसेच विरोधी पक्षाचा आवाज आपल्या कार्यकाळात दाबला जाणार नाही अशी सर्व विरोधी पक्षाच्या वतीने मी अपेक्षा करतो असे राहुल गांधी यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणात सांगितले. 

 

राहुल गांधी विरोधी पक्षनेते  “शॅडो पी एम” 

लोकसभेत मागील १० वर्षात विरोधी पक्षनेता नव्हता. परंतु यावेळी कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या रूपात एक सक्षम, अभ्यासू विरोधी पक्षनेता मिळाला. हे संवैधानिक पद राहुल गांधी सांभाळणार आहेत. या पदाला शॅडो पी एम असेही संबोधतात. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्या प्रमाणे सर्व भत्ते मिळत असतात. ED, CBI इत्यादि एजनसीच्या प्रमुखांची नियुक्ती केंद्र सरकार कडून होत असते यानिवडवेळी विरोधी पक्ष नेत्याची संमती आवश्यक असते. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेतही विरोधी पक्ष नेत्याला स्थान असते. मुख्य म्हणजे ते विरोधकांचा चेहरा असतील. सरकारने केलेल्या नियुक्त्याना पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा या बाबत ते भूमिका घेऊ शकतात.  

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!