देशात एन डी ए सरकार, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान
देशात एन डी ए सरकार, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान
राष्ट्रपति भवनातील भव्य प्रांगणात राष्ट्रपति द्रोपती मुर्मू यांनी पंतपधान नरेंद मोदी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या दिमाखदार शपथविधी सोहळ्यास देशविदेशातील बरेच मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानसह ७२ मंत्र्यानी पदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, आणि ३६ राज्यमंत्री अश्या ७२ जणांनी शपथ घेतली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते होय.
मंत्रिमंडळात ७२ मंत्र्यांमधून २७ ओबीसी, १० अनुसूचित जातीचे, ५ अनिसुचीत जमातीचे आणि ५ अल्पसंख्यांक नेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राला ६ मंत्रिपदं
दोन कॅबिनेट मंत्री : १) नितीन गडकरी, २) पियुष गोयल ( दोन्ही भाजपा )
चार राज्यमंत्री : १) रामदास आठवले (आर पी आय ), २) रक्षा खंडसे, ३) मुरलीधर मोहोळ ( दोन्ही भाजपा ) ४) प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद नाही. त्यांना राज्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी wait and watch च्या भूमिकेत.