बौद्ध पोर्णिमे निमित्त ठाण्यात भव्य “कवि संमेलन”
ठाणे : २९.०५.२०२४
गौतम मित्र मंडळ सिध्दार्थ नगर कोपरी ठाणे ( पूर्व ) यांचे विद्यमाने बौद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने पाच दिवसीय संयुक्त जयंती मोहत्सवाचे आयोजन केले होते, या निमित्ताने दिनांक २६ मे २०२४ रविवार रोजी सांयकाळी ठिक सात वाजता भव्य “कवि संमेलन” आयोजित करण्यात आले होते, सदर प्रसंगी उपस्थित कवींना ढोल ताश्याच्या गजरात फूलांची उधळण करित व सुखदेव कर्डक आणि सहकारी यांचे दांडपट्टा लाठीकाठीचे प्रात्येक्षिक मिरवणूकीत सादर करण्यात आले. वाजत गाजत कवींना काव्य विचार मंचावर पाचारण करण्यात आले.
या वेळी कवी संमेलनाचे अध्यस्थानी कवी वसंत हिरे होते तर कवी संमेलनाचे सुत्रसंचनालन प्रिं संजय रोकडे यांनी केले , सदर कवी संमेलनास मा. कवी पत्रकार आबासाहेब चासकर, व्ही जी सकपाळ, राजरत्न राजगुरु, अक्षय सकपाळ, सुरेखाताई गायकवाड, सुजाताताई सावंत, शा. बाळासाहेब जोधंळे, धनजय सरोदे, जे एन जानराव इत्यादि कवींनी सहभाग दर्शविला होता, या कवीसंमेलनाचे आयोजन सुपारक कला मंच ठाणे शाहिर सुकदेव कर्डक यांनी केले केले. तर उपस्थितांचे आभार गौतम मित्र मंडळाचे अध्यक्ष आयु, राजेश गाडे यांनी मानले.