प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला ऑफर विधानसभेला एकत्र लढू

प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला ऑफर विधानसभेला एकत्र लढू
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाला आपण विधानसभेला एकत्र लढूया अशी ऑफर दिली आहे.त्यामूळे आतापासूनच काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडी च्या नेत्यांनी आपआपसांत जुळवून घ्यावे. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र रहाणार नाही म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूका लढतील, असे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी देशात भाजपाच्या १७० च्याही आसपास जागा येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यामुळेच कॅांग्रेसला आतापासूनच विधानसभेसाठी आपल्याला एकत्र लढता येईल त्यासाठी वंचित सोबत युतीची सुरुवात करा, अशी ऑफरच बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी लोकसभेसाठी एकत्र लढली. मात्र विधानसभा निवडणूका हे तीनही पक्ष वेगवेगळे लढतील, असे मी स्पष्टपणे सांगतो. असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
काँग्रेसचे बरेच नेते आम्हाला भेटत आहे, त्यांना आपण विधानसभेमध्ये एकत्र लढू शकतो असे सांगत असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकी पूर्वीच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत यावे, यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करताना दिसत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत तरी ते एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसला विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची ऑफर दिली आहे. यामुळे आता काँग्रेसच्या भूमिके कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.