डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उसळला जनसागर.. हजारो भिमसैनिकांचे अभिवादन.

महेंद्र धांडे. प्रतिनिधी उगवतां सूर्य
दि. १३ एप्रिल. दरवर्षी प्रमाणे जयंती च्या पूर्वसंधेला वर्षी पुतळा स्मारक समिती तर्फे सुभाष टेकडी, आंबेडकर चौक, उल्हासनगर ४ यथे मोठ्या उत्साहात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी पूज्य. भंते डॉ.एन. आनंद महा थेरो व भिखु संघ ह्यांनी बुद्ध वंदना घेतली समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . ह्या वेळी पुतळा स्मारक समितीचे राव साहेब खराते, आनंद बागडे, आर एस गवई, कपिल कांबळे, उपस्थित होते.
यावेळी समता सैनिक दल तसेच भारतीय बौध्द महासभा यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली.
विविध विभागातील हजारो भीम अनुयाही ढोल ताश्याच्या गजरात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चौकात आले होते. त्याच बरोबर विविध पक्ष्याचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. शिवसेचे संदीप डोंगरे, पी आर पी चे माजी नगरसेवक प्रमोद टाले, माजी नगरसेवक प्रशांत धांडे, वंचित चे नेते सारंग थोरात, दिवाकर खळे, सुरेश सोनवणे, आर पी आय चे कमलाकर सूर्यवंशी, कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर, राजेश वानखडे, संदेश सपकाळ, राहुल कोजगे, सुरेश देशमुख, राष्ट्रवादी चे प्रदेश सचिव प्रविण खरात, जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री, विकास खरात, काँग्रेसचे वामदेव भोयर, महिला बाल विकास च्या राणी भैसाणे, आणि अॅड. मनिषा झेंडे. तसेच संविधान बहुद्देशीय संस्था चे भाई रोकडे, संजय वाघमारे, निलेश भगत, रोशन गवई, प्रकाश इंगळे, विजय पवार, प्रेम ढेरे, सचिन काकडे, राजू सुर्यवंशी, महेंद्र धांडे, सिध्दार्थ बागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.