दहावीच्या परीक्षेत प्रतीक्षा धांडेला ९१ टक्के गुण


प्रतीक्षा महेंद्र धांडे हीला  दहावीच्या परिक्षेत ९१ टक्के गुण 

उल्हासनगर :  उल्हासनगर कॅम्प चार  मधील गुरुनानक विद्यालयातील विद्यार्थीनी  प्रतीक्षा महेंद्र धांडे ही दहावीच्या परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुभाष टेकडी, उल्हासनगर येथे राहणारी  प्रतीक्षा धांडे ही गुरुनानक विद्यालयात शिकत आहे. दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला असून तिला या परीक्षेत ९०.८० टक्के गुण मिळाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने हे यश संपादन केले आहे.

नवी मुबंई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे व दीक्षा भरत धांडे यांनी प्रतीक्षा महेंद्र धांडे हीचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  तसेच वंचित बहुजन आघाडी, संविधान बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनेही प्रतीक्षा चा गौरव करण्यात आला. यावेळी वंचित चे  ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात, दिवाकर खळे, तसेच संविधान बहुउद्देशीय संस्था चे  नीलेश भगत, संजय वाघमारे, रोशन गवई, सुनिल मोहिते, विजय पवार, प्रेम ढेरे, कैलास टपाल व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन तिने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


One thought on “दहावीच्या परीक्षेत प्रतीक्षा धांडेला ९१ टक्के गुण

  • May 17, 2025 at 12:13 pm
    Permalink

    मनःपूर्वक अभिनंदन💐

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!