अखेर मंत्री मंडळ शपथविधी नागपूर राजभवन मध्ये पार पडला !
अखेर सरकारमधील ३९ आमदारांचा शपथविधी सोहळा नागपूरमधील राजभवनात पार पडला. शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अश्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यापैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता सगळ्यांचे लक्ष हे खातेवाटपाकडे असणार आहे.
अखेर मंत्री मंडळ शपथविधी झाला
भाजपचे शपथ घेतलेले आमदार
- कोथरुड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते 2014 पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बावनकुळे हे 2004 पासून आमदार आहेत. यंदाची त्यांची आमदार म्हणून पाचवी वेळ आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची यंदाची आमदार म्हणून निवडून येण्याची आठवी वेळ आहे. ते शिर्डीचे आमदार आहेत.
- संकटमोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून यंदाची ही सातवी वेळ आहे.
- आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यांची यंदाची आमदार म्हणून सलग चौथी वेळ आहे.ते वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.
- पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या भाजपच्या विधान परिषद सदस्य आहेत.
- अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत.त्यांची आमदार म्हणून सलग तिसरी वेळ आहे.
- नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची यंदाची आमदार म्हणून दुसरी वेळ आहे. ते कणकणवील मतदारसंघाचे आमदार
- शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
- जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.ते शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. त्यांची यंदाची आमदार म्हणून पाचवी वेळ आहे.
- पंकज भोयर यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची वर्धा मतदारसंघाचे आमदार म्हणून ही तिसरी वेळ आहे.
- मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून निवडून येण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. त्या जिंतूर मतदारसंघाच्या आमदार आहेत.
- माधुरी मिसाळ यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून ही चौथी वेळ आहे.
- अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून ही तिसरी वेळ आहे. ते राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
- आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फुंडकर यांची आमदार म्हणून ही तिसरी वेळ आहे. ते खामगाव मतदारसंघाचे आमदार आहेत.
- संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सावकारे हे भाजपचे भुसावळ मतरादसंघाचे आमदार आहेत. आमदारकीची हॅटट्रिक करणारे ते आमदार आहेत.
- गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून ही सातवी वेळ आहे. ते ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
- मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.ते मलबार हीलचे विधानसभेचे आमदार अहेत.
- जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
शिवसेना शिंदे गट शपथ घेतलेले आमदार
- उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सामंत यांची यंदाची आमदार म्हणून निवडून येण्याची पाचवी वेळ आहे.
- शंभुराजे देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
- दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुसे यांची आमदार म्हणून ही सलग पाचवी वेळ आहे. ते मालेगाव बाह्यचे आमदार आहेत.
- भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांची आमदार म्हणून सलग चौथी वेळ आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अहर्त.
- बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जय सेवालाल असं म्हणत संजय राठोड यांनी शपथीची सांगता केली.
- संजय शिरसाठ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून निवडून येण्याची चौथी वेळ आहे. ते संभाजीनगर पश्चिमचे आमदार आहेत.
- प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदार म्हणून चौथी वेळ आहे.
- योगेश कदम यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत.
- आशिष जैस्वाल यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.ते रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
- प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची ही आमदार म्हणून दुसरी वेळ आहे. ते राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
- गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदारकीची ही पाचवी वेळ आहे
राष्ट्रवादी अजित पवार गट शपथ घेतलेले आमदार
- नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
- हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अल्लाह साक्ष शपथ घेतो की, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
- धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. धनंजय मुंडे परळी विधानसभेचे आमदार आहेत.
- आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी दादा गटाच्या सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार आहेत.
- इंद्रनील नाईक यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी वेळ आहे.
- माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2009 पासून आमदार आहेत.
- बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांची आमदार म्हणून ही सलग तिसरी वेळ आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
- मकरंद जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मकरंद जाधव हे वाईचे आमदार आहेत. ते 2009 पासून आमदार आहेत.
- दत्ता भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.