T20 च्या थरारक सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय
३०.०६.२०२४ वृत्त संकलन : महेंद्र धांडे
रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून T20 विश्वचषक खेचून आणला.
१७ वर्षानंतर भारतीय संघाने विजयश्री खेचून आणली. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकली. अशी कामगिरी करणारा भारत हा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या नंतरचा दूसरा संघ ठरला.
भारताच्या २० षटकात ७ बाद १७६ धावा झाल्या. त्याचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेचा ८ बाद १६९ धावांवर डाव आटोपला.
सुरवातीला भारतीय डावाची पडझड झाली असताना विराट कोहली संघासाठी धावून आला. त्याने केलेल्या ५९ चेंडूत ७६ धावा त्यासोबतच अक्षर पटेलच्या ३१ चेंडूत ४७ धावा या दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्यात फार मोलच्या ठरल्या. त्याबरोबरच सूर्यकुमार ने पकडलेला झेल हा सामन्याचा कलाटणी देणारा क्षण ठरला. बूमराह, हार्दिक, अक्षर यांची चमकदार खेळी तसेच रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व या सर्व बाबीमुळे आज भारतीय संघाला T20 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवता आला.