नालंदा वेलफेअर असोसिएशन च्या वतिने विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप
पनवेल : २२ जून २०२४
वृत्त संकलन : भोलादास नागदेवे
नालंदा वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीने दिनांक २२ जून २०२४ रोजी कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन, पनवेल संचालित श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित माध्यमिक शाळा, वाकडी, ता. पनवेल, जिल्हा-रायगड येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाला माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती कृष्णा पाटील यांनी संस्थेविषयी माहिती दिली. तसेच नालंदा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नालंदा वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. हिरालाल भोसले, उपाध्यक्ष सौ. ललिताताई निंबाडे, खजिनदार श्री राहुल कुसरे, तसेच सदस्य श्री सुनील मसाने, सौ. सुनीता डबरासे, सौ. अनुराधा नागदेवे, सौ. अंजली वाघ उपस्थित होते. तसेच ईसाक शेख सर, अधिक्षिका श्रीमती अंजली रामदास राऊत, श्री रत्नाकर केणी सर,श्री सोळनकर सर, श्री महाजन सर श्रीगावित सर, श्री भुकरे सर, श्री शेळके सर, सौ व्ही आर पाटील आदी शिक्षकवृंद आणि कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली निलेश पाटील यांनी केले.