लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती ..


पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती

दिन-दलित, कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे.

जग बदल घालूनी घाव

मज सांगून गेले भीमराव ..

अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. अण्णा भाऊ  हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील जातीय भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला. 

तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२० — १८ जुलै , १९६९)

अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अण्णा भाऊ साठे हे (अस्पृश्य) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचाराचे, प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी त्यांच्या “मुंबईची लावणी” आणि “मुंबईचा गिरणीकामगार” या दोन गाण्यांतून मुंबईला ‘दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान आणि अन्यायपूर्ण’ असे म्हणले आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.

अण्णा भाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट

वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)

टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)

डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)

मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)

वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)

अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)

फकिरा (कादंबरी – फकिरा)

अश्या या समाजसुधारक लोकशाहीर  साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त  विनम्र अभिवादन 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!