डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी.
जल्लोष फक्त जल्लोष
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी.
उल्हासनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी करण्यात आली.
सुभाष टेकडी चौक येथील नुकतेच अनावरण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मूळे जनमानसात आनंदाचे वातावरण पसरले आहे. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिति च्या वतीने करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याला आंबेडकरी जनता १३ एप्रिल ला मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आली होती. तसेच १४ तारखेला समितिच्या वतीने भव्य मिरवणूक आयोजित केली होती त्या मिरवणुकीत महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश होता. DJ आणि संगीताच्या तालावर सगळी जोशात नाचत होती. पुतळा समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, भाई रोकडे, प्रमोद टाले, दिवाकर खळे, प्रवीण खरात, संजय वाघमारे, प्रशांत धांडे, संदेश सकपाळ, कपिल कांबळे, आनंत सोनताटे, रमेश गवई, रावसाहेब खराते, धम्म सेवक सिद्धार्थ बागडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात, युवराज भगत शिवसेनेचे संदीप डोंगरे आदि मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सुभाष टेकडी येथील शहीद मारोतिराव जाधव रिक्शा चालक मालक संघटना च्या वतीने जयंती निमित्त जनतेला थंड पेय शरबत आणि भोजनदान दिले. यावेळी रोहिदास मारोती जाधव, अध्यक्ष नंदू शिंदे, बळिराम खोब्रागडे, शेखर दळवी, सुनिल इंगळे, राहुल शिरसाट, योगेश वाघमारे, दिनेश पोवळे आदींनी परिश्रम घेतले.
संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जयंती निमित्त १३ एप्रिल रोजी रात्री अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेला लाडू वाटण्यात आले. यावेळी संस्थेचे रोशन गवई, नीलेश भगत, विजय पवार, प्रेम ढेरे, सचिन काकडे, राजू सूर्यवंशी, महेंद्र धांडे, आदि उपस्थित होते.
सुभाष टेकडी चौका जवळच महामानव, क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भिम अनुयायांना आईस क्रीम व मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित नेते सारंग थोरात उपस्थित होते. प्रा. सुरेश सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
सिद्धार्थ फाउंडेशन येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सऱ्यांच लक्ष वेधून घेत होती. सिद्धार्थ फाउंडेशनने सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या पटांगणात भव्य दिव्य DJ आणि विद्युत रोषणाई करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या विभागातील जनतेची सोय केली होती. अतिशय सुबक अशी विद्युत रोषणाई संगीताच्या तालावर लाहान थोर नाचत होती. बाबासाहेबांचा जयजयकार करत होती. सिद्धार्थ फाउंडेशनचे महेंद्र अहिरे, सतीश सोनवणे, विकी जगताप, दर्शन पवार, रूपेश पवार, सागर बनकर, प्रफुल पवार, दिपक गरुड, राकेश अहिरे, वाल्मीक सोनवणे, सुमित साळवे, महादू जेलु, प्रकाश सोनवणे, करण पगारे, कैलास धिवरे, भूषण मगरे आदि संस्थेचे पदाधिकारी जयंतीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत होते.
बौद्ध सामाजिक संस्था, नागसेन नगर येथील बौद्ध समाज संघटना अंतर्गत बौद्ध सामाजिक संस्था च्या वतीने येणाऱ्या सर्व मिरवणुकीचे स्वागत करताना पिण्याचे पाणी आणि थंड सरबत यांचे वाटप करण्यात येत होते. अध्यक्ष कैलास पळसपगार, मिलिंद थोरात, अरुण होवाळ, अभिनव शेजव, नीलेश कीर्तने आणि इतर सदस्यांचा सहभाग होता.
कुर्ला कॅम्प येथे माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी मोठा स्टेज उभारून DJ व विद्युत रोषणाई केली होती. येथेही तरुणांनी संगीताच्या तालावर ठेका धरला होता.
बाजूलाच माजी नगरसेविका अंजली साळवे आणि कॉँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी जयंतीनिमित्त भव्य प्रमाणात विद्युत रोषणाई आणि DJ लाऊन आंबेडकरी जनता थीरकत होती.
संभाजी चौक येथील मनसेचे प्रदीप गोडसे यांनी उभारलेला अतिशय सुंदर देखावा जनतेच लक्ष वेधून घेत होता. प्रदीप गोडसे प्रत्येक वर्षी विविध सणांच्या दिवशी त्या प्रकारचा देखावा उभारतात. त्यामुळे जनता त्यांच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने बघत असते.
गायकवाड पाडा येथे जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. DJ च्या तालावर तरुणांनी ठेका धरला. गायकवाड पाडा जे पी सिंफनी पासून रॅायल फ्लोरा व पुन्हा गायकवाड पाडा जे पी सिंफनी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक काढण्यात आली. कैलास पाटील प्रवीण पाटील, रमेश पाटील तसेच अरुण काकळीस व शेकडो भीम अनुयायी मिरवणुकीत सहभागी झाले होते.