बौद्ध संघर्ष सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद


महबोधी  महाविहार मुक्ती आंदोलन  !

संघर्ष सभेला राजकारण विसरून एकत्र आला  बौद्ध समाज

उल्हासनगर : महाबोधी महाविहार ताब्यात घेण्याकरीता उल्हासनगर येथे दि. १५/१०/२०२५ रोजी  तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणात बौद्ध संघर्ष सभा आयोजित केलेल्या भव्य सभेला बौद्ध अनुयायी मोठ्या संखेने उपस्थित होते. दुपारी चार वाजता सुरू होणारी सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली तरी जनतेचा उत्साह कमी झाला नव्हता. विचारपीठावर गायनाचा कार्यक्रम चालू होता. भन्ते विनाचार्य यांना यायला उशीर झाला. परंतु उपस्थिती कमी होत नव्हती तर वाढतच होती.

सायंकाळी भन्ते विनाचार्य यांचं अगदी जल्लोष पूर्ण वातावरणात आगमन झालं. सुभाष टेकडी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विनाचार्य भन्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर घोषणांच्या गजरात भन्ते विनाचार्य आणि इतर भिक्खु संघ तसेच भीम अनुयायी सभास्थळी आले.

सर्वप्रथम भन्ते डॉ. एन. आनंद महाथेरो यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले नंतर भन्ते विनाचार्य यांनी दीप प्रज्वलित केले व सभेला सुरवात झाली. त्याअगोदर भन्ते दिपंकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सभेपूढे मांडली.

भन्ते डॉ. एन. आनंद महाथेरो यांनी प्रथम आपले विचार मांडले. त्यानंतर भन्ते सुगतानंद थेरो, भन्ते धम्मदर्शी, भन्ते राहुल बोधी यांनी थोडक्यात आपले विचार मांडले. भन्ते विनाचार्य यांना आपले विचार मंडण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न केला.

भन्ते विनाचार्य यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले, १३४ वर्षापासून सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या संघर्षाची सखोल माहिती व मार्गदर्शन सर्वांना करून दिली. तसेच येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशातील संपूर्ण बौद्ध समाजाने दिल्लीत आंदोलन करण्यासाठी यावे असे आवाहन सभेपूढे केले. जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.

प्रा. सुरेखा पैठण़े यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असे सुरेख सूत्र संचालन करत बौद्ध संघर्ष सभा पार पाडली.

विशेष म्हणजे राजकारण विरहित हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासकांनी या संघर्ष सभेला लावलेली उपस्थिती उल्लेखनीय होती.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!